Android's Meaning | Android म्हणजे काय ? What is Android

Android Meaning

What is Android ? अँड्रॉइड म्हणजे काय ?

Android ही एक मोबाइल ओपरटिंग सिस्टिम (mobile operating system) आहे. जी लिनक्स करनेल (Linux kernel) आणि काही ओपन सोर्स (Open source) सॉफ्टवेअर software च्या अपडेटेड (modification) रूपातून साकारण्यात आलेली आहे.

अण्ड्रोइड ची सुरुवात तशी तर टचस्क्रीन (touch screen) उपकरण (device) जसे की स्मार्टफोन (मोबाइल) आणि टॅब्लेट (tablet) यांच्या करिता बनविण्यात आलेली होती.


Developer ऑफ Android. अण्ड्रोइड चे संशोधक कोण ?

अण्ड्रोइड या OS चे डेवलपर हे कॉन्जोर्टियम (consortium) असून ते ओपन हँडसेट अलायन्स म्हणजेच Open Handset Alliance या नावाने देखील ओळखले जातात. पण महत्वाचे म्हणजेच गूगलने (Google) Android ला कमर्शियली स्पोंसर्ड केलेलं आहे. नेमकं सांगायचं म्हटलं तर गूगलने अण्ड्रोइड ला विकसित केलेले आहे.


Properties of Android. अण्ड्रोइड चे वैशिष्टे.

Android हे फ्री आणि ओपेन सोर्स सॉफ्टवेअर आहे. अण्ड्रोइड चे source code हे अण्ड्रोइड ओपेन सोर्स प्रोजेक्ट (Android Open Source Project ) म्हणजेच AOSP या नावाने ओळखले जातात.

अण्ड्रोइड चे परवाने हे अपाचे लायसन्स अंतर्गत परवानाकृत आहेत. तसे बघितले तर अण्ड्रोइड उपकरण हे प्री-इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरने अगोदरच सुसज्ज असतात. म्हणजेच अण्ड्रोइड उपकरणात गूगलचे जे मालकी असलेले सॉफ्टवेअर आहेत जसे की, google chrome, google play हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केलेले उपकरण आपल्याला मिळतात. आपण या सॉफ्टवेअरना uninstall करू शकत नाहीत.


अण्ड्रोइड चा प्रसार

जगातील 70 टक्के Android Device हे गूगल एकोसिस्टिम ने वेढलेले आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही.

2011 पासून स्मार्टफोन आणि 2013 पासून टॅब्लेट करिता जागतिक स्तरावर android ही बेस्ट सेलिंग मोबाइल os म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टिम बनली आहे. येवढेच नाही तर मे-2017 मध्ये 2 बिलियन मासिक अॅक्टिव युजर असलेली ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून नावाजलेली आहे. ऑपरेटिंग सिस्टिमच्या इतिहासात ही सर्वाधिक वापरली जाणारी OS ठरली आहे.

जानेवारी 2021 च्या आकडेवारी नुसार गूगल प्ले स्टोरवर जवळपास 3 मीलियन ॲप असल्याची नोंद आहे.


Table of Content

1)   Android History अण्ड्रोइडचा इतिहास

a.    Android Version History अण्ड्रोइड व्हर्जनचा इतिहास

2)   Android Features अण्ड्रोइडचे फीचर्स

a.    Andro. Interface इंटरफेस

b.    Andro. Applications अप्लीकेशन्स

c.     Andro. Memory Management माहिती व्यवस्थापन

3)   Android Hardware अण्ड्रोइड मधील साधने (हार्डवेअर)

4)   Android Development अण्ड्रोइड चा विकास

5)   Conclusion सारांश

 

1)    Android History अण्ड्रोइडचा इतिहास

 

सन 2003 ऑक्टोबर मध्ये Andy RubinRich Miner, Nick Sears, and Chris White या चार डेव्हलपर्स नी अमेरीकेतील कॅलीफोर्नीया राज्यातील पालो अल्टो शहरात अँड्राइड इन कॉर्पोरेशन (Android Inc.) ची स्थापना केली.

 

या कंपनीने एप्रिल 2004 मध्ये सर्वप्रथम डीजीटल कॅमेरांकरीता ॲडवांस ऑपरेटींग सिस्टीम तयार करावी असे ठरविले.

 परंतु नंतर अवघ्या 5 महीन्यानंतरच डीजीटल कॅमेरांचा जागतीक स्तरावर स्कोप कमी असल्याचे ओळखून या कंपनीने मोबाईल हँडसेट करीता ऑपरेटींग सिस्टीम तयार करण्याचे ठरविले. त्याकाळी Symbian आणि माइक्रोसोफ्टचे windows mobile ही हँडसेट ओपेरेटिंग करिता फारच प्रसिध्द अशा कंपन्या होत्या.

कंपनी नवीन असल्याने पैसा गुंतवण्यास इनवेस्टर तयार होत नव्हते. त्यामुळे लवकरच कंपनीचे दिवाळे निघाले.

आणि जुलै 2005 मध्ये गुगलने अँड्राइड कॉर्पोरेशनला केवळ 50 मिलीयन अमेरीकन डॉलर्सला कंपनीच्या जुन्या 4 डेव्हलपर्स ना नोकरी देण्याच्या करारासह विकत घेतले.

 

a)   Android Version History अण्ड्रोइड व्हर्जनचा इतिहास

सन 2003 मध्ये अँड्रॉइड कॉर्पोरेशन व्दारे अँड्रॉइडचे डेव्हलपमेंट सूरू झाले. परंतु त्यानंतर 2005 मध्ये गुगलने अँड्रॉइडला विकत घेतले. गुगल आणि OHA व्दारे सर्वप्रथम बेटा वर्झन चा विकसन करण्यात आला.

ऑक्टोबर 2008 मध्ये सर्वप्रथम T-Mobile G1 (म्हणजेच HTC Dream) मोबाईल करीता Android 1.0 ही मोबाइल ऑपरेटींग सिस्टीम पब्लीकली लोकांकरीता रिलीझ करण्यात आली होती.

Android 1.0 आणि Android 1.1 ही ओएस विशिष्ट अशा कोडनेम शिवायच प्रसिध्द करण्यात आलेली होती. तरीही त्यांनी Android 1.0 ला “ॲस्ट्रोबाय” व Android 1.1 करीता “बेंडर” अशी नामावली दिलेली होती. परंतु ही नामे ऑफीसिअली देण्यात आलेली नाहीत.

त्यानंतर प्रोजक्ट मॅनेजर Ryan Gibson याने  Android 1.5 या OS ला “कपकेक” हे नाव दिले आणि त्यांनतर सर्वच वर्झनना इंग्रजी अल्फाबेटच्या क्रमाने डेझर्ट ची नावे देण्यात आलेली आहेत. सध्या Android 11 हे OS मार्केट मध्ये लाँच करण्यात आलेले आहे.


खालील तक्ता बघून तूम्हाला अँड्रॉइडच्या सर्व ओएस वर्झनची माहीती नक्कीच समजेल. खालील तक्ता बघा.

नाव

वर्झन संख्या

स्टेबल वर्झनची रिलीझ तारीख

API लेवल

सेक्युरीटी सपोर्ट आहे / नाही

अधिकृत नाव नाही

1.0

September 23, 2008

1

नाही

1.1

February 9, 2009

2

नाही

कपकेक Cupcake

1.5

April 27, 2009

3

नाही

डोनट Donut

1.6

September 15, 2009

4

नाही

इक्लीअर Éclair

2.0 – 2.1

October 26, 2009

5 – 7

नाही

फ्रोयो Froyo

2.2 – 2.2.3

May 20, 2010

8

नाही

जींजरब्रेड Gingerbread

2.3 – 2.3.7

December 6, 2010

9 – 10

नाही

हनीकोम्ब Honeycomb

3.0 – 3.2.6

February 22, 2011

11 – 13

नाही

आइसक्रीम सँडविच Ice Cream Sandwich

4.0 – 4.0.4

October 18, 2011

14 – 15

नाही

जेलीबीन Jelly Bean

4.1 – 4.3.1

July 9, 2012

16 – 18

नाही

कीटकॅट KitKat

4.4 – 4.4.4

October 31, 2013

19 – 20

नाही

लॉलीपॉप Lollipop

5.0 – 5.1.1

November 12, 2014

21 – 22

नाही

मॉर्शमॅलोव Marshmallow

6.0 – 6.0.1

October 5, 2015

23

नाही

नोगट Nougat

7.0 – 7.1.2

August 22, 2016

24 – 25

नाही

ओरीओ Oreo

8.0 – 8.1

August 21, 2017

26 – 27

आहे

पाय Pie

9

August 6, 2018

28

आहे

अँड्रॉइड- 10 
Android 10

10

September 3, 2019

29

आहे

अँड्रॉइड- 11 
Android 11

11

September 8, 2020

30

आहे

 

2) Android Features अण्ड्रोइडचे फीचर्स


a) Interface

Android मुख्यत: वापरकर्त्याच्या प्रत्यक्ष हाताळणीवर आधारीत आहे. जसे की, स्क्रीन वर दिसणारे ऑब्जेकला झूम करणे, टच करणे, स्क्रीनला खालीवर स्क्रोल करणे. तसेच मॅसेजींग करणे, कॉलींग करणे ज्यामध्ये विडीओ कॉल आलेत.

तसेच ऑटो करेक्शन आणि डीक्शनरी चे फीचर्स बघायला मिळतात, वेब ब्राउझींग करणे, वॉइसबेस्ड सिस्टीम म्हणजेच आवाजाच्या आधारे विविध कामे करणे. मल्टीटच आणि मल्टीटॉस्कींग सुध्दा महत्वाचे फीचर्स अँड्रॉइड मध्ये आलेत.

याबरोबरच स्क्रीन रेकॉर्ड, टीव्ही रेकॉर्डींग, विविध भाषांचा सपोर्ट आहे.

कनेक्टीव्हीटी मध्ये जीएसएम, सीडीएमए, ब्ल्युटूथ आले, थेटरींग सुविधा, विडोओ स्ट्रीमिंग करणे, मेडीया सपोर्ट आहे म्हणजे आपण गाणे, विडीओ बघू शकतो, फोटो सुध्दा काढले जातात. याव्यतिरीक्त एक्सटर्नल एसडी कार्ड सपोर्ट असतो. 


b)   Applications

अँड्रॉइड मध्ये Google apps चा समावेश होतो. जसे की, Gmail, Google Maps, Google Chrome, YouTube, Google Play Music, Google Play Movies & TV, आणि बरेच काही ॲप्स येतात.

 

अँड्रॉइड ॲप चे डेव्हलपमेंट हे JAVA आणि Kotlin या Computer लँग्वेज मध्ये करण्यात येतात.

तसेच अँड्रॉइड ॲप ची निर्मीती करणारे सॉफ्टवेअर हे C , C++ या लँग्वेज मध्ये करण्यात येतात.


 

सारांश :

अशाप्रकारे आपण अँड्रॉइड बाबत माहीती बघीतलेली आहे. वरील माहीती ही विविध स्त्रोतांतून सारांश स्वरूपात म्हणजेच संक्षिप्त करून दिलेली माहीती आहे. दिवसेंदिवस अँड्राइड वाढता वापर आणि या क्षेत्रात होणारे नवनवीन संशाधन यामुळे अँड्राइड चा विकास हा सतत चालू राहणार आहे. तरी मी आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शंका, मदत हवी असल्यास नक्कीच विचारा.

 

 


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post